मुंबई
मध्य रेल्वेने उद्या (२८ मे) ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी/नेरुळ या स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक असेल. त्यानुसार, सकाळी ११.१० वाजल्यापासून ते दुपारी ०४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकच्या कालावधीत ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ०४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. सोबतच वाशी/नेरूळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ०४.०९ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दर रविवारी मेगाब्लॉकमुळे गर्दीचा सामना कराव्या लागणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.