मुंबई – जवळपास १० महिन्यांपासून मुंबई महापालिकेने शहराच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामांचा अनेक ठिकाणी बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांनी या सौंदर्यीकरण कामाच्या खर्चबाबतची माहिती पालिकेकडे माहिती अधिकारांतर्गत मागितली होती. परंतु ही माहिती हवी असल्यास त्यासाठी आधी ३४ हजार २३० रुपये भरा, असे उत्तर पालिकेच्या के पश्चिम विभागाने राजूल पटेल यांना दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर येताच मुंबईचे सौंदर्यीकरण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पालिका प्रशासन कामाला लागले आहे.या कामांसाठी तब्बल १७०० कोटींची तरतूद करण्यात आली. आतापर्यंत ९१५ कामे पूर्ण झाली आहेत. त्यावर ६१७ कोटी रूपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे.पण पाऊस सुरू होताच या सौंदर्यीकरण कामाचा खरा चेहरा समोर येऊ लागला आहे.अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई बंद पडली आहे. रंगरंगोटी केलेली ठिकाणी फिकी पडू लागली आहेत. याबाबतची सविस्तर माहिती माजी नगरसेविका पटेल यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून मागितली होती. मात्र या माहितीसाठी पालिकेने त्यांच्याकडे ३४ हजार २३० रुपये आधी पालिकेकडे भरून मूळ पावती सादर करावी असे सांगितले आहे.
राजूल पटेल यांचे असेही म्हणणे आहे की,अंधेरीच्या लोखंडवाला भागात सौंदर्यीकरण कामाचा रंग उडाला आहे. विद्युत रोषणाई आणि बनविलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.अनेक ठिकाणे अस्वच्छ असल्याचे दिसून येत आहे
मुंबईच्या सौंदर्यीकरण कामाच्या माहितीसाठी ३४ हजार रुपये भरा
