मुंबई :
काळबादेवी येथील २५० वर्षांपूर्वीच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील साडेतेरा लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंदिराच्या वतीने आलेल्या तक्रार अर्जानंतर अज्ञात ट्रस्टीविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. याआधी २०१८ साली मंदिरातील साडेआठ लाखांच्या दागिन्यांसह इतर वस्तूंची चोरी झाली होती. या वस्तू चोरीस किंवा त्याचा अज्ञात व्यक्तीने अपहार केल्याबाबत मंदिरातील ट्रस्टी जयवंत देसाई यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.