मुंबई- मुंबईतील सर्वांत जुन्या क्रॉस मैदान येथे होणार्या रामलीलेतील मुस्लिम कलाकार आणि प्रेक्षक आता गायब होऊ लागले आहे, तसेच रामलीला पहायला येणार्या लोकांच्या संख्येत एकूणच मोठी घट झाली आहे,अशी खंत या रामलीलाचे आयोजक सुरेश मिश्रा यांनी व्यक्त केली आहे.
क्रॉस मैदानातील रामलीला कार्यक्रमाचे आयोजक सुरेश मिश्रा म्हणाले की, मुंबईतील रामलीला हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानले जायचे.आतापर्यंत रामलीलेतील कलाकारांमध्ये मुस्लिम कलाकार जास्त असायचे. मात्र आता हे प्रमाण नगण्य झाले आहे.त्यासाठी आता अयोध्येतून कलाकारांना बोलवावे लागत आहे. यामुळे खर्च वाढला आहे. तसेच सरकारकडूनही काहीच मदत मिळत नाही. केवळ रामाचे नाव जपण्याने काय होणार आहे?. तसेच आझाद मैदानात रामलीला आयोजित करणारे त्रिंबक तिवारी हे म्हणाले की,सध्या मुस्लिम प्रेक्षक रामलीला पाहायला येत नाहीत. विशेष म्हणजे हिंदू प्रेक्षकांचे प्रमाणही खूपच कमी झाले आहे.ही परिस्थिती सुधारली नाही तर पुढील काही वर्षानंतर रामलीला दुर्मिळ होईल.