मुंबई – मुंबई महापालिका प्रशासनाने पश्चिम उपनगरातील सर्व प्रभागातील रस्ते टिकाऊ आणि मजबूत करण्याची योजना आखली आहे. हे रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनविले जाणार असून त्यासाठी तब्बल १७८ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या कामाचे कंत्राट मे. आर. जी. शाह इन्फ्राटेक कमला (जे. व्ही) कंपनीला दिले आहे.
यावेळी पुनर्बांधणी व बनवलेले रस्ते टिकाऊ, मजबूत राहावेत म्हणून या कामाच्या कंत्राटदाराला काम पूर्ण झाल्यानंतर फक्त ८० टक्के रक्कम दिली जाणार आहे. तर उरलेली २० टक्के रक्कम ही ठराविक काळासाठी या कामाची गुणवत्ता सिद्ध झाल्यानंतर दिली जाईल. पश्चिम उपनगरातील परिमंडळ ४ मधील पी-उत्तर आणि परिमंडळ ७ मधील आर-दक्षिण विभागातील सर्व रस्त्यांचे मजबुतीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण केले नाही. या रस्त्यांचा दोष-दायित्व कालावधी १० वर्षे असणार आहे.
दरम्यान, या कामासाठी ई-टेंडर काढण्यात आले होते. रस्ते सुधारण्याचा अंदाजित खर्च १५५ कोटी इतका होता. ई-टेंडर प्रक्रियेत पाच कंत्राटदार सहभागी झाले होते. त्यानंतर कंत्राटदार मे. आर. जी. शाह इन्फ्राटेक कमला (जे.व्ही)यांनी कमीत कमी रकमेचे टेंडर भरल्याने हे काम त्यांना देण्यात आले.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रस्त्यांसाठी १७८ कोटी खर्च करणार
