मुंबई – मुंबईतील ४८ कलाकार येत्या १ ते १२ फेब्रुवारी या काळात राजस्थानमधील देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे मनोरंजन करण्यासाठी जाणार असून संतोष परब यांच्या मुक्ता इव्हेंटने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सैनिकांसाठी अशा प्रकारे कार्यक्रम करण्याचे हे २३ वे वर्ष आहे.
या कार्यक्रमात मुंबईतील विविध कलाकार, संस्था व तंत्रज्ञही सहभागी होणार आहेत. सैनिकांच्या जीवनाला सलामी देणारा हा नृत्य, नाट्य व संगीताचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. हे सर्व कलाकार या दौऱ्यात जोधपूर, पोकरण, जैसलमेर, ब्रम्हसर, रामगढ, बबलीयानवाला, खाजूवाला, सांचू, बिकानेर या सीमावर्ती भागातील सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे मनोरंजन करणार आहेत. मुंबईहून हे कलाकार रवाना झाले असून त्यांच्या सहकार्यासाठी विविध संस्थांनीही पुढाकार घेतला आहे.