Home / News / मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार निती आयोगाचा अभ्यास अहवाल सादर

मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार निती आयोगाचा अभ्यास अहवाल सादर

मुंबई – मुंबई महानगर आणि परिसराचा जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – मुंबई महानगर आणि परिसराचा जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला.सात विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्यास आगामी सहा वर्षात मुंबईचा जीडीपी दुप्पट होण्याची अपेक्षा अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत निती आयोगाने केलेल्या अभ्यासाअंती विकसित केलेल्या प्रारूपाचे सादरीकरण करण्यात आले.याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
निती आयोग महाराष्ट्रासह १३ राज्यांसाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करीत असल्याचे यावेळी आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.राज्यांच्या विकासाबरोबरच महानगरांचा विकास करण्यात येईल. मुंबई,सुरत, वाराणसी आणि विशाखापट्टणम या चार महानगरांवर पथदर्शी प्रकल्प म्हणून निती आयोग काम करीत आहे. यामध्ये मुंबई महानगर परिसराचा जीडीपी २०३० पर्यंत २६ लाख कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे, असेही सुब्रमण्यमण्यम यांनी सांगितले.

Web Title:
संबंधित बातम्या