मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये फक्त २६ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा विचार केला तर, एप्रिल महिन्यातील हा निचांक आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी होत चालला असल्याने मे महिन्यामध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट
