दुबई- मी पळून गेलेलो नसून माझ्या वडिलांच्या उपचारासाठी दुबईत आहे. मी लवकरच भारतात परतणार असल्याचा दावा बैजू रविंद्रन याने केला आहे. परत येण्याची निश्चित वेळ ठरली नसली तरी मी लवकरच तिथे येऊन लोकांना काय ते सांगेन, असेही तो म्हणाला आहे.
बैजू रविंद्रन याच्यावर गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, ज्या गुंतवणूकदारांना माझ्याबरोबर या पुढेही राहायचे असेल त्यांचे सर्व पैसे मी परत देईन. आम्ही पैसे विविध ठिकाणी गुंतवलेले आहेत. काहींना सोबत राहायचे नाही. ते माझ्यासमोर अडचणी निर्माण करत आहेत. आज माझ्याकडे काही नाही, केवळ एक शून्य आहे. मात्र मला एक टक्का जरी संधी मिळाली तरी मी सर्व काही पुन्हा नव्याने उभे करेन.
मी भारतात येणार! बैजू रविंद्रनचा दावा
