मी केवळ हिंदू मतांवर विजयी एकही मुस्लिम मत नाही! नितेश राणेंचा दावा

मुंबई- मुंबईत विधान भवनात नव्याने निवडून आलेल्या आमदारांच्या शपथविधी वेळी कणकवलीचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आमदारकीची शपथ घेतली. यावेळी ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील जनतेच्या प्रेमामुळे मी तिसऱ्यांदा निवडून आलो आहे. हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्यांवर मी निवडणूक लढवली. माझ्या मतदारसंघातील हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणावर मतदान केले. मला पडलेल्या ५८ हजार मतांपैकी एकही मत मुसलमानाचे नाही हे मी हक्काने सांगू शकतो. माझा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी विचाराचा मतदारसंघ आहे. पुढील ३ वर्षे सत्ताधारी आमदार म्हणून मी विकासाची प्रक्रिया सुरू ठेवणार आहे.

ते पुढे म्हणाले की, जनतेला माहित आहे टीका करणारे कावळे निवडणुकीपुरते असतात, आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. ३६५ दिवस २४ तास जनतेच्या सेवेसाठी हजर आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top