अल साल्व्हाडोर
मिस युनिव्हर्स २०२३ स्पर्धेत सहभागी झालेल्या नेपाळच्या जेन दीपिका गॅरेट या वजनदार मॉडेलची सर्वत्र चर्चा झाली. जगप्रसिद्ध सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेली जेन ही पहिली वजनदार मॉडेल आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत जेनला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली. जेन या स्पर्धेत नेपाळचे प्रतिनिधित्व करत होती. ती मिस नेपाळ राहिली आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन तीने शरीराचा आकार, शरीराची सकारात्मकता आणि स्वीकारार्हता यासंबंधीच्या सर्व साचेबद्ध कल्पना मोडीत काढल्या.
मिस युनिव्हर्स २०२३ च्या मंचावर प्रेक्षकांनी जेनचे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. तिचा आत्मविश्वास आणि शैली पाहण्यासारखी होती. मॉडेलिंगसोबतच ती नर्स आणि व्यवसाय विकसक म्हणूनही काम करते. ती शारीरिक सकारात्मकता आणि महिलांच्या हार्मोनल आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेसाठी काम करते. जेन दीपिका गॅरेट सध्या २२ वर्षांची आहे. ती काठमांडू, नेपाळची रहिवासी आहे. तिचा जन्म अमेरिकेत झाला. जेनने २० मॉडेलना हरवून मिस नेपाळचा किताब पटकावला होता.