मुंबई- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुलगी आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांची भायखळ्यातील दगडी चाळीत जाऊन भेट घेतली. त्यावेळी गीता गवळी यांच्यासोबत त्यांच्या आई आशा गवळी देखील होत्या. या भेटीमुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
गीता गवळी भायखळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. या भेटीचा फोटो आशा गवळी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या भेटीमुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गीता गवळी ठाकरे गटात जाण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू झाली .परिणामी भायखळा मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान आमदार यामिनी जाधव आणि गीता गवळी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
मिलिंद नार्वेकर दगडी चाळीत गीता गवळी यांची भेट घेतली
