भाईंदर – मिरा- भाईंदर महापालिका परिवहन विभागाच्या बसमध्ये आता ऑनलाइन पेमेंट म्हणजेच युपीआय पेमेंट सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.या परिवहन विभागाने त्यासाठी सातत्याने चाचण्या घेऊन वाहकांना क्यूआर कोड तयार करून दिले आहेत.प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे पालिका आयुक्त संजय काटकर यांच्या सूचनेनुसार ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
पालिका आयुक्त संजय काटकर यांनी यासंदर्भात सांगितले की,परिवहन विभागाने केलेली चाचणी यशस्वी ठरल्यानंतर सोमवारी ६० बसेसना क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुढील दोन दिवसांत ही सेवा १०० टक्के कार्यान्वित होईल.त्यामुळे सर्व प्रवाशांनी या डिजिटल सेवेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा,असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.मिरा- भाईंदर परिवहन विभागाच्या दररोज ८५ ते ९० बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल आहेत.या बसमधून किमान ९५ हजार प्रवासी प्रवास करत असतात.