मिरज – तालुक्यातील आरग गावचे ग्रामदैवत असलेल्या यल्लम्मा देवीची वार्षिक यात्रा यंदा शनिवार २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. ही यात्रा २९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. यात्रेचे यंदाचे १०० वे वर्ष आहे.
यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शनिवारी बोनी, रविवारी देवीचा नैवेद्य आणि सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यादिवशी सकाळपासून देवीच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा होईल. विविध मानकऱ्यांच्या घरी पालखी जाईल. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता किचाचा विधी होणार आहे. यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम यात्रा समितीने आयोजित केले आहेत. रविवारी रात्री देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम, सोमवारी सायकल व धावण्याच्या स्पर्धा, रात्री लावणी शो, मंगळवारी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, बुधवारी बुलेट शर्यत व तमाशा, गुरुवारी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. यात्रेचे यंदाचे १०० वे वर्ष आहे.
मिरजेच्या आरग गावामध्ये शनिवारी यल्लम्मा देवीची यात्रा
