रत्नागिरी – मिरकरवाडा बुलडोजर कारवाईनंतर रत्नागिरी शहरातील मुख्य ठिकाणी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे समर्थनार्थ पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर मंत्री राणे यांचा हिंदू योद्धा म्हणून उल्लेख करत त्यांच्या फोटोसह बुलडोजरचा देखील फोटो लावण्यात आला आहे. याशिवाय यावर देश आणि राज्याच्या सागरी सीमेवर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, म्हणून हिंदुत्व वादी सरकार हवे!, मंत्री नितेश राणे यांचा चढला पारा, अनधिकृत बांधकामांना नाही थारा !,अनेक दशके रखडलेली स्व्छता मोहीम हाती घेतल्याबद्दल समस्त रत्नागीरीकरांकडून धन्यवाद! हा मजकूर लिहला आहे.
दरम्यान, मंत्री राणे यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर येथे धडक दौरा केला. त्यावेळी त्यांनी याठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानंतर बंदर परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवले त्यामुळे जागा मोठ्या प्रमाणात मोकळी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राणे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून पोस्टर लावले आहेत. या पोस्टरची रत्नागिरीत चर्चा सुरु आहे.