मुंबई- मुंबईतील महापुरास कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीची साफसफाई यंदा संथ गतीने सुरू असल्याचे दिसत आहे.कारण मागील दीड महिन्यात २२ एप्रिल पर्यंत मिठी नदी तील केवळ २३ टक्केच गाळ काढण्यात आला आहे.मात्र,दुसरीकडे ३१ मे पूर्वी मिठीतील १०० टक्के गाळ काढला जाईल असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.दरम्यान,मुंबईतील छोटया नाल्यातील ४० टक्के गाळ काढला आहे.त्याचेही ३१ मे पर्यंतचे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबू नये म्हणून ३१ मे पूर्वीच १०० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी पालिकेच्या संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यासाठी अतिरिक्त मनुष्याबाळणी यंत्रसामुग्री तैनात करण्यास सांगितले आहे.यंदा ६ मार्चपासून मुंबईत नालेसफाई काम सुरू झाले असल्याचा दावा पालिका करत आहे.सध्या नालेसफाईचे काम समाधानकारक होत असल्याचे पालिका उपायुक्त उल्हास महाले यांनी म्हटले आहे.यावर्षी मुंबईतील शहर आणि उपनगर भागात्तील ९६२७७९.९७ टक्के गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत संपूर्ण मुंबईतील ३९२७७९.२३ टक्के म्हणजे एकूण ४० टक्के गाळ काढण्यात आला आहे.