मुंबई – मुंबई महापालिकेच्या हद्दीत होणार्या विकास कामांमुळे अनेक नागरिकांना प्रकल्पबाधित व्हावे लागते. या नागरिकांना पर्यायी घरे देण्यासाठी चेंबूरच्या माहुल गाव परिसरात इमारती बांधल्या आहेत. मात्र सामाजिक संस्थांच्या विरोधामुळे रिक्त असलेल्या या गृहप्रकल्पातील निवासस्थानांपैकी ४ हजार सदनिका आता महापालिका कामगार, कर्मचाऱ्यांना अल्प दरात मालकी हक्काने देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली.
माहुल गाव येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या इमारतींमधील हजारो घरे रिक्त आहेत. काही सामाजिक संस्थांच्या विरोधामुळे ही नवीन घरे तशीच रिकामी आहेत. हीच घरे आता महापालिका कर्मचाऱ्यांना अल्पदरात मालकी हक्काने मिळणार आहेत. ही घरे पालिकाकर्मचार्यांना देण्यात यावी अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई आणि समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली होती. त्यामुळे याबाबत महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि सह-आयुक्त चोरे यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. ही घरे पालिका कामगारांना देण्यात यावी याकरीता माहुल येथील प्रकल्पाची प्रत्यक्ष भेट देऊन गेल्या आठवड्यात पालिका प्रशासनाचे अधिकारी व समन्वय समितीचे पदाधिकारी यांनी संयुक्त पहाणी केली. त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांकडून सकारात्मक भूमिका दिसून आली.
माहुलमध्ये उभारलेल्या इमारतींमध्ये पालिका कर्मचाऱ्यांना अल्पदरात घरे
