पुणे- अतिवृष्टीमुळे मावळ आणि मुळशीमधील सर्व पर्यटनस्थळे २९ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. या दोन्ही भागांतील विविध पर्यटनस्थळे, मंदिरे, धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास बंद घातली आहे.हवामान विभागाने पुढील पाच दिवस पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मावळ व मुळशी विभागाचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी २९ जुलैपर्यंत मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत.
मावळ आणि मुळशीमधील पर्यटन स्थळे २९ जुलै पर्यंत बंद
