मालवण-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या बांधकाम सल्लागार डॉ.चेतन पाटील याचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने काल गुरुवारी फेटाळला.आरोपी पाटील हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता.मात्र सात महिन्यांतच म्हणजे २६ ऑगस्ट रोजी हा पुतळा कोसळला. याप्रकरणी पुतळा शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटीलला अटक करण्यात आली.हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.पोलीस कोठडी संपल्यानंतर चेतन पाटीलने तुरुंगातून जामिनावर सोडण्याची विनंती करीत अर्ज केला होता.त्याचा हा अर्ज गुरुवारी मुख्य जिल्हा न्यायाधीश एच.डी. गायकवाड यांनी फेटाळून लावला केला.या खटल्यात सरकारच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील गजानन तोडकरी आणि रुपेश देसाई यांनी काम पाहिले.