Home / News / मालदीवचे राष्ट्रपती आज भारत भेटीवर

मालदीवचे राष्ट्रपती आज भारत भेटीवर

माले – मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू रविवारी भारत भेटीवर येणार आहेत. ६ ते १० ऑक्टोबर या कालावधीत त्यांचा भारतात मुक्काम...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

माले – मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू रविवारी भारत भेटीवर येणार आहेत. ६ ते १० ऑक्टोबर या कालावधीत त्यांचा भारतात मुक्काम असेल. भारत व मालदीवमध्ये व्यापार व इतर विषयांवर यावेळी द्विपक्षीय चर्चा होईल .मागील वर्षी भारताविरूध्द वक्तव्य केल्याने भारत व मालदीव मधील संबंधात कटुता आली होती . मालदीव चीनच्या बाजूने झुकत असल्याचे चित्रही निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपति मोहम्मद मुइज्जू यांचा भारत दौरा खूप महत्वपूर्ण समजला जात आहे. यापूर्वी ते ९ जूनला मोदींच्या शपथविधीसाठी भारतात आले होते. पुन्हा ते भारतभेटीवर येत आहेत. भारत दौऱ्यात ते मुंबई आणि बंगळुरूला भेट देणार आहेत . राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनाही भेटणार आहेत. इंडिया आउट अशी भारत विरोधी भूमिका घेणारे मोहम्मद मुइज्जू यांनी आता मात्र माझा तसा उद्देश नव्हता असे सांगून सारवासारव केली आहे. त्यांच्या भारत दौऱ्यात पर्यटन , व्यापार तसेच धार्मिक व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे समजते.

Web Title:
संबंधित बातम्या