Home / News / मालगाडीचे इंजिन बिघडले पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मालगाडीचे इंजिन बिघडले पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पालघर :- पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बिघडल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या...

By: E-Paper Navakal

पालघर :- पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बिघडल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या वीस ते पंचवीस मिनिट उशिराने धावत होत्या. त्याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

केळवे रोडजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन अचानक फेल झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेसदेखील पालघर रेल्वे स्थानकावर थांबली होती. तसेच, गुजरातहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर स्थानकावर थांबल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने केळवे रोड परिसरात दाखल झाले. त्या नंतर बिघाड झालेल्या मालगाडीच्या इंजिनच्या दुरुस्तीचे काम सुरु केले.

Web Title:
संबंधित बातम्या