सोल – दक्षिण कोरियात गेल्या महिन्यात मार्शल लॉ लावण्याची अचानक घोषणा करणारे राष्ट्राध्यक्ष युन सॉक यो यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत हे वॉरंट जारी केले.द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यो यांनी गेल्या महिन्यात देशात अचानक मार्शल लॉ घोषित केला होता. त्यावर विरोधी पक्ष आणि सर्वसाधारण नागरिकांनी जोरदार विरोध केल्यावर हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. तीन वेळा झालेल्या सुनावणीच्या वेळी ते हजर न राहिल्याबद्दल त्यांच्यावर हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. प्रशासनावर टीका व देशात बंडाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दक्षिण कोरियातील विविध शासकीय संस्थानाही त्यांची चौकशी करायची असून देशाविरोधात केलेल्या बंडाच्या आरोपात त्यांना जन्मठेप किंवा मृत्यूदंडाचीही शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्राध्यक्षांच्या वकीलांनी हे वॉरंट बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |