मायकेल मार्टिन यांची दुसऱ्यादा आयर्लंड पंतप्रधानपदी निवड

डब्लिन – आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मायकेल मार्टिन यांची दुसऱ्यांदा निवड झाली. संसदेत झालेल्या मतदानात फियाना फेल पक्षाचे नेते मायकेल मार्टिन यांच्या बाजूने ९५ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात ७६ मते पडली. ते दुसर्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायकेल मार्टिन यांचे एक्सवर पोस्ट करून अभिनंदन केले. मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आयर्लंडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेत असल्याबद्दल मार्टिन यांचे अभिनंदन करतो. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी भारत आयर्लंडसोबत एकत्र काम करण्यास वचनबद्ध आहे.
मार्टिन हे आयर्लंडच्या संसदेत सर्वाधिक काळ खासदार राहिलेल्यांपैकी एक आहेत. ते १९८९ मध्ये कॉर्क साउथ सेंट्रल मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यापूर्वी २०२० ते २०२२ दरम्यान त्यांनी पंतप्रधानपद भूषवले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top