माफी माग किंवा ५ कोटी दे सलमानला पुन्हा धमकी

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी मिळाली आहे. जिवंत रहायचे असेल तर बिष्णोई मंदिरात माफी मागा किंवा ५ कोटी रुपये दे असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे . काल रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एक संदेश प्राप्त झाला. त्यात लिहिले होते, ‘जर सलमान खानला जिवंत रहायचे असेल तर त्याला आमच्या बिष्णोई मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल किंवा ५ कोटी रुपये द्यावे लागतील. आमची टोळी अजूनही सक्रिय आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top