मुंबई:
मुंबईतील मानखुर्द परिसरातील मंडला येथे मंगळवारी मध्यरात्री एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीने उग्र रुप धारण केले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 12 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आग रद्दी आणि रिकाम्या तेलाच्या ड्रममध्ये लागली होती. मानखुर्द येथील मांडला परीसारात भांगाराचे दुकान आहे. या ठिकाणी पुस्तकांची रद्दी, जून पेपर तसेच इतर भंगारातील वस्तू जमा केल्या जातात. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.