मानखुर्दमध्ये बाप-लेकाकडून महिलेवर अंधाधुंद गोळीबार

मुंबई – मुंबईच्या मानखुर्दमध्ये शेजाऱ्यांसोबतचा वाद एका महिलेच्या जीवावर बेतला. शेजारच्या महिलेसोबत वाद झाल्यामुळे संतप्त झालेल्या बाप-लेकाने महिलेवर गोळी झाडून तिची हत्या केली. मानखुर्द भागात झालेल्या या गोळीबारात फरजाना इरफान शेख नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेजारच्या दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले की, दोन कुटुंबातील भांडणानंतर हा गोळीबार झाला. या गोळीबारात महिलेला आपला जीव गमवावा लागला. मात्र या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील आमच्या हाती लागले. यात आरोपी महिलेच्या घरात घुसून तिच्यावर गोळीबार करत असल्याचे दिसले. दोन्ही आरोपींची ओळख पटवली आहे आणि त्यांना पकडण्यासाठी शोध सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top