नवी दिल्ली – अॅक्सीस -मॅक्स लाईफ कथित गैरव्यवहारात सेबीच्या प्रमुख माधबी बूच यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारी माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांची २०१४ सालची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
हंगामी मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्या. तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठासमोर सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. स्वामी यांनी अॅक्सीस -मॅक्स लाईफ कथित गैरव्यवहारात ५ हजार १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप या जनहित याचिकेद्वारे केला होता. मात्र त्यांनी माधबी बूच यांच्यावर आरोप करूनही त्यांना प्रतिवादी केले नव्हते. त्यमुळे न्यायालयाने स्वामी यांची याचिका फेटाळली.
सुब्रमण्यम स्वामी यांनी १३ मार्च २०२४ रोजी न्यायालयात एक शपथपत्र सादर केले होते. या शपथपत्रात स्वामी यांनी आरोप केला होता की, माधबी बूच या ४ फेब्रुवारी २०१५ ते ३ एप्रिल २०१७ या कालावधीत मॅक्स हेल्थकेअरच्या अतिरिक्त संचालक होत्या. त्यानंतर त्या सेबीच्या प्रमुख बनल्या. त्यांच्या या पार्श्वभूमीमुळे सेबीने अॅक्सीस-मॅक्स लाईफ गैरव्यवहाराचा तपास योग्यरित्या केला नाही.
माधबी बूच यांच्या विरोधातील स्वामींची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली
