माथेरान – भारतातील दुर्मिळ डोंगरी रेल्वेपैकी एक असलेली ‘माथेरानची राणी ‘ म्हणजेच टॉय ट्रेन आता रूळावर आली आहे.मात्र या टॉयट्रेनचा प्रथम श्रेणीचा प्रवास स्वस्त आणि द्वितीय श्रेणीचा प्रवास महाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रथम श्रेणीचे तिकीट ३४० वरून चक्क ९५ रुपये तर द्वितीय श्रेणीचे तिकीट ५० वरून ५५ रुपये केले आहे.त्यामुळे प्रवाशांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
नेरळ ते माथेरान दरम्यान चालणारी ही मिनी ट्रेन रेल्वे प्रशासनाला दरवर्षी लाखो रुपयांचा महसुल मिळवून देते.तरीही तिकीट दरामध्ये केलेला हा भेदभाव हा प्रवाशांना धक्का देणारा आहे.द्वितीय श्रेणीचेही तिकीट दर कमी करावे अशी मागणी प्रवाशी करत आहेत.
तसेच यापूर्वी या टॉयट्रेनच्या दिवसातून पाच ते दहा फेर्या व्हायच्या.आता केवळ दोन फेर्या करण्यात आल्या आहेत.त्याचप्रमाणे या गाडीचा वेगही ताशी ८ किलोमीटर असल्याने माथेरान- नेरळ या अंतरासाठी तीन ते साडेतीन तास लागतात.या गाडीला दोन द्वितीय श्रेणी,एक प्रथम श्रेणी आणि दोन मालवाहू डबे जोडलेले असतात.
द्वितीय श्रेणीच्या एका डब्यातून साधारण साठ प्रवासी प्रवास करू शकतात.
‘माथेरान राणी’चा प्रथम श्रेणीचा प्रवास स्वस्त! द्वितीय श्रेणी महाग
