माथेरानमध्ये पर्यटकांनाआनंदाऐवजी मनस्ताप

माथेरान – दिवाळीनिमित्त माथेरानला येणाऱ्या तुफान गर्दीमुळे पर्यटकांना आनंदाऐवजी मनस्ताप सहन करावा लागत आहे. माथेरानच्या प्रवेशद्वारावर करआकारणी साठी केवळ एकच खिडकी असल्यामुळे इथे पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यातच माथेरानच्या घाट रस्त्यावर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जागोजागी पर्यटक अडकून पडले.सध्या दिवाळीचा हंगाम असल्याने अनेक सरकारी व खाजगी आस्थापनांना सुट्ट्या आहेत. या काळात मुंबई जवळच्या माथेरान या पर्यटनस्थळाला पर्यटकांची मोठी पसंती असते. माथेरानमध्ये वाहनांना बंदी आहे. त्यामुळे एका ठराविक टप्प्यापर्यंत वाहन नेऊन नंतर चालत वा घोड्यावरुन जावे लागते. या ठिकाणी करआकारणी करण्यासाठी प्रशासनाने केवळ एकाच खिडकीची सोय केल्याने तिथे लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. मोठ्या प्रमाणात वाहने आल्याने घाटात वाहतूक कोंडी झाली. माथेरानसाठी नेरळ रेल्वेस्थानकावरून टॅक्सीने माथेरानला जाणाऱ्यांची संख्याही मोठी होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. या साऱ्या गोंधळामुळे व गर्दीमुळे पर्यटनासाठी आलेल्यांच्या आनंदावर विरजण पडले. गर्दीचा विचार करुन प्रशासनाने आधीच व्यवस्था करायला हवी होती, अशी मागणी पर्यटक करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top