नेरळ – मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून ते माथेरान या पर्यटनस्थळी जाणारी मिनी ट्रेन सेवा येत्या १ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरु होणार आहे. पावसाळ्यात १ जूनपासून ही ट्रेनसेवा बंद केली जाते ती १५ ऑक्टोबर पासून पुन्हा सुरु केली जाते. यंदा मात्र ती सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान झाले असून दिवाळी सुटीच्या आधी ती सुरू झाली असती तर त्याचा फायदा झाला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
माथेरानची मिनी ट्रेन१ नोव्हेंबर पासून सेवेत
