मुंबई – मुंबईत आज पावसाची मधूनमधून जोरदार हजेरी सुरू असताना आज मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकातील रेल्वे रुळाला तडे गेले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डाऊन धिम्या लाईनवरील लोकल वाहतूक जलद मार्गावर वळवली. परिणामी लोकल वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कर्मचार्यांनी रेल्वे रुळाची तात्पुरती डागडुजी करुन धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक सुरू केली. मात्र त्यानंतरही लोकल वाहतूक १२- १५ मिनिटे उशिराने सुरूच राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
माटुंगा स्थानकातीलरेल्वे रुळाला तडे
