माझ्या विजयाचे श्रेय फडणवीसांना! सत्यजित तांबे यांनी मानले आभार

मुंबई:- नाशिक पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेतील आपल्या पहिल्याच भाषणात आपल्या निवडणुकीतील विजयाचे श्रेय वडील सुधीर तांबे यांच्या कामाला दिले. तर या निवडणुकीचे श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना देऊन आपल्या भाषणात त्यांचे आभार मानले .

अत्यंत नाट्यमय ठरलेल्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले सत्यजित तांबे यांच्या विधान परिषदेतील भाषणाकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांचे सुद्धा लक्ष लागले होते. तांबे यांनी आपल्या भाषणात नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये घडलेल्या घडामोडीची माहिती सांगितली तसेच ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच होऊ शकली आणि त्यात मला भाग घेता आला असे सांगून निवडणुकीचे श्रेय फडणवीसांना दिले. नाशिक पदवीधर मतदार संघातील सुधीर तांबे यांच्या कामाचा आपल्याला फायदा झाला आणि आपल्याला यश मिळाले असेही सांगितले. सत्यजित तांबे हे विधान परिषदेतील अपक्ष आमदार आहेत .

Scroll to Top