कोलकाता: पश्चिम बंगालमधील सीपीआयचे माजी खासदार लक्ष्मण सेठ यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. ही बातमी त्यांनी स्वतः शेअर केली आहे. विशेष म्हणजे आपल्या नववधूसोबतचा एक फोटोदेखील त्यांनी शेअर केला आहे.
कोलकाता येथील रहिवासी असलेल्या मानसी डे या पंचतारांकित कंपनीत काम करणाऱ्या तरुणीशी लक्ष्मण सेठ यांची त्याच्या मित्रामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. लक्ष्मण सेठ आणि मानसी डे यांचा कोलकाता येथे आयोजित एका छोटेखानी सोहळ्यात त्यांचा विवाह पार पडला. खासदार लक्ष्मण सेठ यांचा हा दुसरा विवाह असून त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. सेठ यांनी सुरुवातीला आपल्या दुसऱ्या दुसर्या विवाहाची माहिती दिली नव्हती. पण, त्यांच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यामुळे त्यांनी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर आलेल्या एकाकीपणामुळे दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय घेतला, असे मीडियाशी बोलताना ते म्हणाले. लवकरच कोलकात्यात लग्नाची रिसेप्शन पार्टी आयेजित करणार असून, सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेठ यांना पहिल्या पत्नीपासून २ मुले आहेत.