माजी आ. रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला अखेर रामराम

पुणे -पुण्यातील कसबा पेठचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. धंगेकर हे काँगेस सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आज त्यांनी पत्रकार परिषदेत घेत शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. धंगेकरांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसला आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले की, काँग्रेसने मला भरभरून दिले. माझी कोणावरही नाराजी नाही. सत्ता अनेक वर्ष पाहिली पण सत्तेचा लाभ मिळाला नाही. पक्ष सोडताना मला खुप दुःख होत आहे. आपण सगळी माणसे आहोत. अशा प्रसंगी आपल्याला दुःख होते. मात्र, कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून सांगत होते, चर्चा करत होते. माझी मतदारांशी चर्चा झाली. त्या सर्वांचे म्हणणे आहे की, आमची कामे कोण करणार? लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांची कामे करू शकत नाही. अशा वेळी माझी दोन-तीन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली. मी त्यांच्याशी चर्चा केली. मंत्री उदय सामंत हेदेखील माझे मित्र आहेत. माझी त्यांच्याशीदेखील चर्चा झाली. त्यांनी वारंवार म्हटले की एकदा आमच्याबरोबर काम करा. तसेच मी आमदार असताना आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले होते. त्यांचा चेहरा जनतेत लोकप्रिय आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या या चेहऱ्याबरोबर जाण्यास काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे आज संध्याकाळी मी त्यांना भेटणार आहे. त्यानंतर माझा जो निर्णय होईल तो जाहीर करू.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top