माऊली पालखी सोहळ्यासाठी सातार्‍यात १०८ जादा बसेस

सातारा – सातारा जिल्ह्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी होणार आहे.६ ते ११ जुलैअखेर पालखी सोहळा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे.या पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाच्या सातारा विभागाने सुमारे १०८ जादा बसेस उपलब्ध केल्या आहेत.या बसेस विविध मार्गावर धावणार आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचा लोणंद, तरडगाव,फलटण व बरड येथे मुक्काम होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पालखीच्या दर्शनासाठी येत असतात. पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी महामंडळाच्या सातारा विभागातील सर्वच्या सर्व ११ आगार सज्ज झाले आहेत.पालखी सोहळ्यात सातारा १५, कराड १०, कोरेगाव ८,फलटण २०, वाई ८,पाटण ६, दहिवडी ७, महाबळेश्वर ६, मेढा ८, पारगाव खंडाळा १२, वडूज ८ अशा मिळून १०८ बसेस विविध मार्गावर धावणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top