माऊंट मेरी जत्रेत भाविकांची गर्दी

मुंबई – वांद्रे (प) येथील माऊंट मेरी जत्रेसाठी आज दुसऱ्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ही जत्रा १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानिमित्त १५ सप्टेंबरपर्यंत बेस्टकडून अतिरिक्त बस चालवण्यात येत आहेत.दरवर्षी या जत्रेला सर्वधर्मिय हजेरी लावतात. या जत्रेच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. या जत्रेसाठी भाविक लोकलने वांद्रे रेल्वे स्थानकावर येऊन तेथून बेस्टच्या बसने प्रवास करतात. त्यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत बेस्टकडून १२१ अतिरिक्त बस वांद्रे रेल्वे स्थानक (प.) ते हिल रोड उद्यान यादरम्यान चालवण्यात येत आहेत. बेस्ट बसमार्ग क्रमांक सी-७१, ए-२०२, ३२१ मर्या., ए-३७५, ४२२, ४७३ व सी-५०५ या बसमार्गावर अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top