सिडनी- फिफा वुमेन्स वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये स्पेनने इंग्लंडचा १-० ने पराभव केला. अंतिम सामना जिंकल्यानंतर स्पेनच्या खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. मात्र, सेलिब्रेशन सुरू असताना लाजीरवाणा प्रकार घडल्याचं समोर आलंय. स्पेनच्या महिला खेळाडूसोबत धक्कादायक घटना घडली. सेलिब्रेशन करताना स्पेनची स्ट्रायकर जेनी हर्मोसोला स्पॅनिश एफए अध्यक्ष लुईस रुबियल्स यांनी महिला खेळाडूला एक नाही तर 3 वेळा ओठांवर किस केलं. त्यानंतर लुईस रुबियल्स खेळाडूला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. स्पेनच्या पंतप्रधानांनीही नाराजी जाहीर केली. त्याचबरोबर पंतप्रधानांनी माफी मागण्यास सांगितलं. त्यानंतर देसभरात आनंदोत्सव साजरा होत असताना संतापाची लाट देखील पहायला मिळाली. त्यानंतर आता फिफाने मोठी कारवाई केल्याचं पहायला मिळतंय. फिफाने कारवाई केली असून, लुईस रुबियालेसला आगमी फुटबॉल सामन्यातून निलंबित करण्यात आले आहे.