काठमांडू :काठमांडू येथील पशुपतिनाथ मंदिरात महाशिवरात्री २६ फेब्रुवारीला मोठ्या थाट्यात साजरा होणार आहे. पशुपतिनाथ दर्शनासाठी ५ लाख भाविक येणार असल्यामुळे स्थानिक प्रशासन सज्ज झाले आहे. मंदिरासह आजूबाजूच्या परिसरात बुधवारी दारू आणि मांस विकण्यास बंदी घातली आहे.बागमती नदीच्या काठावर असलेल्या पाचव्या शतकातील या मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या पशुपती क्षेत्र विकास ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाशिवरात्रीच्या भव्य कार्यक्रमाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एकूण १०,००० सुरक्षा कर्मचारी आणि ५,००० स्वयंसेवक तैनात केले जाणार आहे. महाशिवरात्रीला भाविकांसाठी पशुपतिनाथ मंदिर पहाटे २.१५ वाजता उघडेल आणि भाविकांना मंदिराच्या चारही दरवाज्यांमधून शिवलिंगाचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त पशुपतिनाथाचे ५ लाख भाविक दर्शन घेणार
