महावितरणच्या कर्मचाऱ्यांना १९ हजार दिवाळी बोनस

मुंबई- राज्यातील महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळीच्या बोनसची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची दिवाळीही गोड होणार आहे.
राज्याच्या ऊर्जा विभागाने ही घोषणा केली. वीज कर्मचारी, अभियंता व अधिकाऱ्यांना १९ हजार रुपये तर सहाय्यक कर्मचाऱ्यांना १३ हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. वीज कर्मचारी संघटनेने ९ ऑक्टोबर रोजी या बोनसची मागणी केली होती. मात्र, आचारसंहितेमुळे यंदा बोनस मिळतो की नाही याची शंका कर्मचाऱ्यांच्या मनात होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top