मुंबई- महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने पहिल्यांदाच दर कपातीचा प्रस्ताव सादर केला आहे.या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास साधारणपणे १ ते १५ टक्के वीजदर कपात होणे अपेक्षित आहे.या निर्णयाचा लाभ राज्यातील दोन कोटींपेक्षा जास्त वीज ग्राहकांना मिळणार आहे. या प्रस्तावानुसार २०२५ – २६ ते २०२९ – ३० या कालावधीमध्ये १२ ते २३ टक्के दर कपात होईल.
महावितरण कंपनी भविष्यात १५ ते १६ हजार मेगावॉट सौर ऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यावर भर देणार आहे.
त्यामुळे महावितरणने
राज्यामध्ये १०० पेक्षा कमी युनिट वीज वापरत असलेल्या ग्राहकांना १५ टक्के दर कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे.ही दर कपात २०२५ – २६ या कालावधीत लागू होईल.तर त्या पुढील काळात २०२७ – २८ मध्ये १०० पेक्षा कमी युनिट वीज वापरत असलेल्या ग्राहकांना १९ टक्के दर कपात लागू होईल. तर २०२८ – २९ मध्ये २५ टक्के दर कपात करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.सध्या प्रत्येक वीज ग्राहकाला युनिट मागे ५ रुपये १४ पैसे द्यावे लागतात.या प्रस्तावानुसार २०२९- ३० मध्ये त्याच ग्राहकांना प्रत्येक युनिट मागे २ रुपये २० पैसे द्यावे लागतील.त्यामुळे हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे.