कोल्हापूर – गेले दहा दिवस सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पेठवडगाव शहराचा जलाधार असणारा महालक्ष्मी तलाव काल शनिवारी पूर्ण क्षमतेने भरला.तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले.तलाव भरल्यामुळे नागरिकांनी तलावाच्या पाण्याचे विधिवत पूजन केले.
हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला की, पूर्वेकडून पाणी बाहेर पडते.ज्या भागाकडून पाणी बाहेर पडते,तो भाग हत्तीच्या सोंडेच्या आकाराचा असल्याने पाणी बाहेर पडले की सोंड फुटली असे म्हणतात.ही सोंड फुटली की वडगांव परिसरातील नागरिक तलावाकडे बघण्यासाठी धाव घेतात. यावर्षी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सांडव्यावरून पाणी बाहेर पडतानाचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.वडगाव शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी १८९० मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी शहराजवळ महालक्ष्मी तलाव बांधला. २१० एकरात हा तलाव आहे. तलावात ३१ फूट ३ इंच आहे. दरम्यान महालक्ष्मी तलाव
भरल्यानंतर पारंपरिक पूजन व ओटी भरण्याचा कार्यक्रम माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या हस्ते करण्यात आले.