Home / News / महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांचे निधन

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांचे निधन

कोल्हापूर- वीज तज्ज्ञ आणि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांचे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कोल्हापूर- वीज तज्ज्ञ आणि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांचे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने इचलकरंजीत निधन झाले. होगाडे यांनी वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सतत आवाज उठवत होते. खेड्यातील शेतकऱ्यांसाठी मुंबईच्या धर्तीवर वीज धोरण राबवण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. इचलकरंजी शहराला पाणी मिळवून देण्यासाठी सुळकुड कृती समिती पाणी योजनेचे प्रमुख म्हणून त्यांची ओळख होती, त्यांनी महावितरणच्या विरोधात राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मोठी आंदोलने उभारली होती.

Web Title:
संबंधित बातम्या