बंगळुरू – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मतदारसंघांत महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारूण पराभव झाला आहे. बेळगावमध्ये समितीच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. बेळगावातील १८ मतदारसंघापैकी ११ जागी काँग्रेसचे तर भाजपचे ७ उमेदवार विजयी झाले. भाजपने निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार केला होता. त्यावरून मुख्यमंत्र्यांच्या एका सभेत एकिकरण समितीने काळे झेंडेही दाखवले होते.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभूत उमदेवारांची नावे – 1. बेळगाव दक्षिण – रमाकांत कोंडुरकर,
- बेळगाव उत्तर – अमर येळ्ळूरकर, 3. बेळगाव ग्रामीण – आर. एम. चौगुले, 4. निपाणी – जयराम मिरजकर, 5. यमकनर्डी – मारुती नाईक, 6. खानापूर –मुरलीधर पाटील
राऊत, फडणवीस उतरले होते प्रचारात
सीमाभागातील एकूण ६ मतदारसंघांवर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यासोबतच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या भागामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे या भागातील मतदार कोणाला कौल देतात, याबाबत उत्सुकता होती.
बेळगाव जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची नावे – 1) दक्षिण – अभय पाटील – भाजप, 2) खानापूर – विठ्ठल हलगेकर- भाजप, 3) निपाणी – शशिकला जोल्ले- भाजप, 4) गोकाक – रमेश जारकीहोळी- भाजप, 5) आरभावी – भालचंद्र जारकिहोळी – भाजप, 6) हुक्केरी – निखिल कित्ती- भाजप, 7) अथणी – लक्ष्मण सौदी – काँग्रेस (भाजप बंडखोर), 8) कागवड – भरमगौडा कागे- काँग्रेस, 9) कित्तुर -बाबासाहेब पाटील- काँग्रेस, 10 ) बैलहोनगल – महानतेश कौझलगे- काँग्रेस, 11) कुडची – महेंद्र तमन्नावर- काँग्रेस, 12) सौदत्ती – विश्वास वैद्य- काँग्रेस,
13) रामदुर्ग – अशोक पट्टण- काँग्रेस, 14) यमकनगर्डी -सतीश जारहीहोळी – काँग्रेस, 15) चिकोडी – गणेश हुक्केरी- काँग्रेस, 16) बेळगाव ग्रामीण – लक्ष्मी हेब्बाळकर – काँग्रेस, 17) उत्तर – राजू शेठ – काँग्रेस, 18) रायबाग – दुर्योधन ऐवळे – भाजप