बेळगाव – कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगाव दौर्यावर आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात फडणवीस प्रचारासाठी आल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी फडणवीस यांना टिळक चौकात काळे झेंडे दाखवले. त्यानंतर बेळगाव पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये, अशी घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील बेळगाव उत्तरचे उमेदवार रवी पाटील यांच्या प्रचारार्थ होणार्या सभेसाठी हजेरी लावली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांंनी सभेपर्यंत जाऊ दिले नाही. काही कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करून परत पाठवण्यात आले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे
