नाशिक – महाराष्ट्राची चेरापुंजी आणि धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणार्या नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात गुरुवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.२४ तासांत म्हणजे एकाच दिवसात या तालुक्यात ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर चार दिवसांत संपूर्ण तालुक्यात २७८२ मिमी पाऊस पडला आहे.
संततधार पावसामुळे तालुक्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.हा पाऊस शेतकरीवर्गासह सर्वांनाच दिलासा देणारा ठरला आहे.भावली धरण ओसंडून वाहत आहे,तर दारणा धरणात ८८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. भाम धरणातही पाणीसाठा वाढू लागला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. प्रामुख्याने तालुक्याचे प्रमुख पीक असलेल्या भातशेतीला या पावसाची मोलाची मदत झाली आहे.कसारा घाटातही सध्या मुसळधार पावसामुळे धुक्याचे साम्राज्य पसरले आहे.पावसामुळे मुंबई- आग्रा मार्गावरील वाहतूकही संथगतीने सुरू आहे. तालुक्यातील आडवण, भावली,टीटोली,बोर्ली,सदो,पिंपरी, देवळे,खैरगाव आदी भागांत परवा शुक्रवारी सर्वदूर धुवाधार पाऊस कोसळला.
‘महाराष्ट्राची चेरापुंजी’ इगतपुरीत एकाच दिवसात ९२ मिमी पाऊस!
