मुंबई – मुंबई महापालिकेचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सोमवार 3 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे हा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करणार आहेत. गगराणी हे आयुक्त आणि प्रशासक म्हणून पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहेत. गेल्या वर्षी इक्बालसिंह चहल यांनी मुंबई महापालिकेचा ५९ हजार ९५४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र त्यात ८ ते १० टक्क्यांनी वाढ होऊन या वर्षी तो ६५००० कोटींच्या पार जाऊ शकतो. यामध्ये प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण, कोस्टल रोड, लिंक रोड, दहिसर ते मीरा-भाईंदर विकासकामांसाठी आणि बेस्ट सेवेसाठी मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. तर जकात कर बंद झाल्यामुळे महसूल वाढीसाठी नवीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. कोरोना काळातील अनुभव लक्षात घेता आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठीही भरीव तरतूद होईल.
महापालिका अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार
