प्रयागराज- प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात आज पुन्हा एकदा आग लागली. छतनाग घाटजवळील नागेश्वर घाट सेक्टर २२ मधील एका खासगी कंपनीने उभारलेल्या वैदिक टेंट सिटीमध्ये ही आग लागली . या आगीमध्ये १२ हून अधिक तंबू जळून खाक झाले. मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. यापूर्वी १९ जानेवारी रोजी गोरखपूरमधील गीता प्रेस कॅम्पमध्ये सिलेंडरच्या गळतीमुळे आग लागली होती. यात दीडशेहून अधिक तंबू जळून खाक झाले होते.
महाकुंभ मेळ्यात पुन्हा अग्नितांडव
