नागपूर – ओमानच्या विमानाचे नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान मस्कतला जात होते. त्यावेळी तांत्रिक बिघाडामुळे विमानाला नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. मात्र, यातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
ओमानच्या सलाम एअरलाईन्सच्या विमानाने बांगलादेशच्या चाट्टोग्राम येथून मस्कतसाठी उड्डाण केले होते. यावेळी विमानाच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. त्यामुळे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. वैमानिकांनी प्रसंगावधान बाळगून वेळीच विमान खाली उतरवल्याने हवाई कर्मचाऱ्यांसह सर्व प्रवासी सुखरुप आहेत.