मुंबई – महाविकास आघाडीमध्ये (मविआ)सर्व काही आलबेल आहे.ही निवडणूक आम्ही एकत्र लढवित आहोत. त्यामुळे मविआमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. आमचे सर्व बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील,असा दावा काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्याप्रसंगी चेन्नीथला बोलत होते.
महायुतीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना जवळपास संपवले आहे. महायुतीचे अस्तित्वच आता उरलेले नाही. शिंदे आणि अजित पवार यांच्या मतदारसंघात भाजपाचेच उमेदवार रिंगणात आहेत. मविआमध्ये मात्र अशी परिस्थिती नाही. मविआमध्ये सर्वाधीक जागा जरी काँग्रेस लढवत असली तरी काँग्रेस घटक पक्ष आणि मित्रपक्षांना सन्मानापूर्वक वागणूक देत आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे भ्रष्ट सरकार हाकलायचे हे आमचे ध्येय आहे,असे चेन्नीथला म्हणाले.
मविआत मैत्रीपूर्ण लढत होणार नाहीत! काँग्रेस प्रभारी चेन्नीथला यांचा दावा
