लंडन – विख्यात गायक एल्टन जॉन यांची दृष्टी अधू झाली होती, त्यांना डाव्या डोळ्याने कमी दिसते हे त्यांच्या चाहत्यांना माहीत होते. एल्टन यांनीच जाहीर कार्यक्रमात याबद्दल सांगितले होते. ते वापरत असलेला विशिष्ट प्रकारचा जाडजूड भिंगांचा चष्मा हीदेखील त्यांची ओळख बनली होती. पण रविवारी त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले की त्यांना आता दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, तेव्हा त्यांच्या लाखो चाहत्यांना धक्काच बसला.
फ्रान्समध्ये गेल्या जुलै महिन्यात एल्टन यांच्या डोळ्यांना जंतुसंसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची दृष्टी कमजोर झाली होती. त्यांना डाव्या डोळ्याने कमी दिसू लागले होते. काही आठवड्यांपूर्वी एल्टन जॉन यांनी आपल्या चाहत्यांना ही बाब सांगितली होती.
रविवारी एल्टन यांचा कार्यक्रम लंडनमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी चाहत्यांसमोर आपली दृष्टी पूर्णपणे कमजोर झाल्याचे एल्टन यांनी सांगितले. मी हा कार्यक्रम बघू शकलो नाही,. केवळ कानांनी ऐकून मी त्याचा आनंद घेतला, असे एल्टन यांनी सांगितले.